ताज्या नवी मुंबई पनवेल मनोरंजन मुंबई रायगड सामाजिक

रायगड कोमसापतर्फे कवितांची कार्यशाळा तसेच खुले कविसंमेलनाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

रायगड कोमसापतर्फे कवितांची कार्यशाळा तसेच खुले कविसंमेलनाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे, अरूण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल/ प्रतिनिधी :
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा तसेच उत्तर-दक्षिण रायगड कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कविंसाठी कवितेची कार्यशाळा आणि खुले कविसंमेलन रविवार, दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह, मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक असून सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे आणि अरूण म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे कोमसापचे अध्यक्ष प्रा.अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, उत्तर रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, दक्षिण रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कवितांच्या कार्यशाळा आणि खुल्या कवि संमेलनास कविंनी उपस्थित रहावेे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे ऍड. मनोज म्हात्रे, ऍड. प्रा. चंद्रकांत मढवी यांनी केले आहे. दुपारच्या होणार्‍या खुल्या कविसंमेलनात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ कवितांना पारितोषिके दिली जाणार आहेत.

Avatar
गणपत वारगडा
संपादक: आदिवासी सम्राट
https://adivasisamratnews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *