20200504_195841
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून अपंग, गरिब व गरजू जेष्ठ आदिवासी व्यक्तींना दिला मद्दतीचा हात

आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून अपंग, गरिब व गरजू जेष्ठ आदिवासी व्यक्तींना दिला मद्दतीचा हात

पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोनाच्या लाॅकडाउनमध्ये अनेक आदिवासी बांधवांची आथिर्क परिस्थिती बिकट झाली. हाताला काम नाही. कुटुंब चालणार कसं?? यासारखे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांसमोर निर्माण झाले आहेत. याचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे.
याचीच एक जबाबदारी म्हणून आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून अध्यक्ष गणपत वारगडा यांनी धोदाणी, मालडूंगे या आदिवासी भागामध्ये अपंग व्यक्ती, अत्यंत गरिब, गरजू शिवाय घरात कोणीही कमावत नाही, आशा आदिवासी बांधवांना आदिवासी सेवा संघाच्या वतीने 2 Kg तांदूळ,1 Kg साखर, 2 Kg पीठ, 1 Kg डाळ या सारख्या दैनंदिनी वस्तू वाटप करण्यात आले.
यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांच्या खांद्यावर आदिवासी बांधवांकडून कौतुकाची थाप मारण्यात आली. याप्रसंगी अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply