IMG-20200619-WA0011
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

शिवसेना पनवेल तर्फे 54 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शिवसेना पनवेल तर्फे 54 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पनवेल/ संजय कदम :
बाळासाहेबांची शिवसेना आज 54 वर्षांची झाली या निमित्ताने देशभर वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे छत्रपती शिवरायांना, बाळासाहेबांना व माँसाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच भगवे झेंडे फडकवून जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या वतीने सर्व नागरिकांना मास्कचे वाटप सामाजिक अंतर राखुन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिरीष बुटाला, महानगर उपसंघटक सुनीत ठक्कर, शहर प्रमुख अच्युत मनोरे, महिला पनवेल शहर संघटक अर्चना कुलकर्णी, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख अनिल कुरघोडे, विभाग प्रमुख सुजन मुसलोंडकर, ग्राहकचे कक्ष महानगर प्रमुख किरण तावदरे, उपतालुका प्रमुख, राकेश टेमघरे, मा.उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, युवासेनेचे पराग मोहिते, संकेत बुटाला, देविदास पाटील, मा.नगरसेवक विश्‍वास म्हात्रे, शाखाप्रमुख भास्कर पाटील, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply