IMG-20200715-WA0008
ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक

“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

—————————
श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी व ऊर्जा निर्माण करणारा 
– राणी जवळेकर
———————–

बदलापूर / अण्णा पंडित :
कोरोना जागतिक महामारीने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात पर्यायाने अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

कु. ज्योती (राणी) जवळेकर या सामाजिक परिवर्तन चळवळीच्या पुरस्कर्त्यां व बदलापूर शहर भाजपा युवा मोर्चा सचिव तसेच आदिवासी विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या राज्य सचिव या पदावर कार्यरत असून त्यांनी कोरोना महामारीच्या भयाला न जुमानता शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन करुन कोरोना महामारीला पायबंद घालण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती गरजवंत, हातमजुरी करणारे, अशिक्षित व शासकीय सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धूणे, सॅनेटायझर व मास्कचा वापर करणे इ. कोरोना महामारी विषयी माहिती देवुन त्यांचे प्रबोधनासह सामाजिक भान ठेवून आदिवासी गरीब व हातमजुरी करणा-या कुटुंबांना दानशूर व सेवाभावी सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करणेस मदत केली आहे. त्यांनी कोरोना महामारी च्या बिकट परिस्थितीत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन “श्रमिक (मु) पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य” या संघटनेने ‘कोरोना योद्धा’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असुन सामाजिक कार्य करण्यास नेहमीच ऊर्जा देईल अशी भावना व्यक्त करुन कु. राणी जवळेकर यांनी श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश संकपाळ आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस तसेच श्रमिक पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुरस्कार प्राप्त राणी जवळेकर या युवा समाजसेविकेचे पक्षपदाधिका-यांसह समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply