IMG-20200809-WA0008
आंतरराष्ट्रीय ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नेरळ पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई सामाजिक

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना

कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित

पनवेल/ सुनिल वारगडा :
जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी कोरोना महासंकट व लाॅकडाऊन असल्याकारणाने सर्व ठिकाणी शासनाचे नियम पाळून आदिवासी कार्यकर्त्यांनी जागतिक आदिवासी दिन साध्या सोप्या पध्दतीने साजरे केले.

पनवेल तालुक्यामध्ये धोदाणी, मालडूंगे परिसरात काही वर्षांपूर्वी आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक असे नामकरण करण्यात आले होते. या हुतात्मा नाग्या कातकरी चौक जवळ आदिवासी क्रांतिकारकांना मानवंदना करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते एकञ येवून हुतात्मा नाग्या कातकरी व क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, हुतात्मा नाग्या कातकरी, क्रांतीकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्यासह अन्य क्रांतीकारकांना मानवंदना देखील करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजात कोरोना आजाराशी लढा व लाॅकडाऊनमध्ये सामाजिक, शासकीय, संगीत, पञकारिता क्षेत्रातील कार्य करणा-या व्यक्तींची दखल घेऊन जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ता. आदिवासी सम्राट तसेच आदिवासी न्यूज अॅण्ड इंटरटेंमेट यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून “कोरोना योद्धा” पुरस्कार सन्मानपञ संपादक, अध्यक्ष गणपत वारगडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मालडूंगे ग्रामपंचायतचे सरपंच हर्षदा सोमनाथ चौधरी, सदस्य जनार्दन निरगुडा, जेष्ठ कार्यकर्ते सी.के. वाक, इंजि. उत्तम डोके, प्रा.रा.जि.प. शिक्षक सोमनाथ चौधरी, चंद्रकांत सांबरी, मा. उपसरपंच काळूराम वाघ, मैद्या चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सिताराम चौधरी, जनार्दन घुटे, गणपत हिरवे, बबन हिरवे, सिताराम वारगडा, पोलीस पाटील नारायण चौधरी, कोतवाल अर्जुन घुटे, सेवा संघाचे उपाध्यक्ष राम भस्मा, सचिव सुनिल वारगडा, सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, गणेश साहू, कमळू चौधरी, किसन चौधरी, गणपत चौधरी आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply