IMG-20200829-WA0013
ठाणे ताज्या विक्रमगड सामाजिक

बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट

बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट

विक्रमगड/ भरत भोये:
खोस्ते गाव येथील युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये बिरसा मुंडा वाचनालयाची स्थापना केली.
समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत व्हावा, तसेच युवकांनी स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवावे, याकरिता वाचन हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे युवकांनी सुरु केलेल्या वाचनालयासाठी “आदिवासी फाऊंडेशन” संस्थेच्या वतिने विविध अभ्यासक्रमाची आणि माहितीपर पुस्तके आणि पुस्तके ठेवण्यासाठी मांडणी (रॅक) भेट स्वरूपात देऊन त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत भोये, उपाध्यक्ष प्रकाश पाटकर, सचिव गुरुनाथ सहारे, जयेश गावित, महेश भोये, सुनिल काकड, भूषण महाले, अनिल दादोड तसेच फाऊंडेशन मित्र परिवार गुरुनाथ आघाणे, भागेश भुसारा, अजय सहारे, कृष्णा सहारे आणि ग्रामपंचयात हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोये, ग्रामपंचायत सदस्य नितेश भोये, मनोज गायकवाड, विजय भोये (सैनिक), दिलीप गावित गुरुजी खोस्ते जि. प.शाळा. आणि गावातील तरुण युवा वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply