20200909_131209
ताज्या सामाजिक

माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचं कोरोनामुळे निधन

माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचं कोरोनामुळे निधन

माथेरान/ प्रतिनिधी:
मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचे थोड्या वेळापूर्वीच कोरोनानं निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जतच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात येत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने रायगडच्या पत्रकारितेला मोठा धक्का बसला आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख साहेब यांनी आपल्या अत्यंत लाडक्या पत्रकाराला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply