20200910_210943
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव

पनवेल/ प्रतिनिधी :
तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यातील जप्त केलेली वाहने, कार, मोटारसायकल, टाटा टेंपो, टाटा डंपर अशा विविध प्रकारची वाहने मूळ मालकास परत करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारात उभी करून ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी जी वाहने पडताळणी करून मूळ मालकाचा शोध घेऊनही ते न सापडल्याने व विविध कारणास्तव परत न देता आल्याने अनेक वर्षांपासून पोलिस ठाण्यात उभ्या केलेल्या वाहनांचा प्रत्यक्ष लिलाव 14.09.2020 रोजी पोलिस ठाण्याच्या आवारात होणार आहे.
सदर वाहनांवर आत्तापर्यंत कोणीही दावा केला नाही आहे. त्याचप्रमाणे मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल तसेच इतर प्रादेशिक परिवहन यांच्याकडे उपलब्ध वाहनांचे मालक मिळून आलेले नाही आहेत. तरी सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी इच्छूकांनी तळोजा पोलिस ठाण्याचा दुरध्वनी-02227412333, 8888841258 येथे संपर्क साधावा अशी माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) आर.डी. अडागळे यांनी दिली आहे.

Leave a Reply