IMG-20200913-WA0060
कर्जत ताज्या सामाजिक

शेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन

शेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन

कर्जत/ मोतीराम पादिर :
शेतकरी – मजुरांना PM किसान योजना व जॉब कार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास तालुक्यातील वाड्या – पाड्यातील ठराविक कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवून तालुक्यातून PM किसानचे २६० व जॉबकार्डसाठी २२० अर्ज भरले असून संबंधित कार्यालयात जमा केले आहेत, असे संघटनेचे उपाध्यक्ष परशुराम दरवडा यांनी सांगितले आहे.
यावेळी आदिवासी ठाकूर समाज संघटनाचे अध्यक्ष श्री.भरत शिद, उपाध्यक्ष श्री. मंगळ केवारी, उपाध्यक्ष श्री.परशुराम दरवडा, सचिव श्री.मोतीराम पादिर, पंचायत समिती सदस्या सौ.जयवंता हिंदोळे, मा. अध्यक्ष श्री.जैतू पारधी, काशिनाथ पादिर, सिताराम केवारी, दत्तात्रय हिंदोळे, वसंत ढोले, विजय बांगारे, मधुकर ढोले, जगन पादिर पोलिस, अर्जुन केवारी, कांता पादिर, प्रकाश केवारी, रामदास केवारी, परशुराम थोराड, किसन वारघडे,जनार्दन सराई, बाळू ठोंबरे, तातू पादिर, गणपत पारधी, काशिनाथ पुंजारा, जगन्नाथ शेंडे आदि. कार्यक्रर्ते उपस्थित होते.

Leave a Reply