20200917_080454
ताज्या रायगड

ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

अलिबाग/ जिमाका :
रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे
नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020.  संस्थांना अर्ज करण्याकरिता मुदत (30 दिवस) दि. 14 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत.  नवीन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे (30 दिवस) दि. 14 ऑक्‍टोबर ते दिनांक 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत.
नवीन रास्त भाव धान्य दुकान मिळण्यासाठी प्राथम्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था),  नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,  नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था.
जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये संबंधित तालुक्याचे जाहीरनामे प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  तसेच आवेदन करण्यासाठी अर्जाचा नमुना संबंधित तहसिलदार कार्यालयाकडे उपलब्ध आहे.
तरी इच्छुकांनी संबंधित तहसिल कार्यालयाकडून निश्चित केलेली फी भरून अर्ज प्राप्त करुन घ्यावेत.  तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज संबंधित तहसिल कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे.

Leave a Reply