20200928_214730
अकोले अहमदनगर ताज्या सामाजिक

भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी पदी डॉलीताई डगळे यांची नियुक्ती

भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी पदी डॉलीताई डगळे यांची नियुक्ती

राजूर/ प्रतिनिधी :
भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांचा (दि. १५ सप्टें.) अकोले तालुक्यातील दौरा व देवगाव येथे पार पडलेल्या बैठक पार पडली. या बैठकीच्या दरम्यान डॉली गणेश डगळे यांची आदिवासी महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी म्हणून सर्वानुमते निवड केली. व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मेघनाथ गवळी यांच्या हस्ते समाजसेविका सौ. डाॅली डगळे यांना आदिवासी महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी पदी नियुक्तीपञ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या महिला कार्यकर्त्यां शशिकला भांगरे, सुनिता भांगरे, उषा कुलाळ, ज्योती नवाळी, मंदाताई कचरे, छाया देशमुख, फसाबाई बांडे, मिनाताई कोंडार, चित्रा जाधव, तसेच अहमदनगर जिल्हा प्रभारी अनिता कडाळी उपस्थित होते.

Leave a Reply