IMG-20200929-WA0012
ठाणे ताज्या महाराष्ट्र मुरबाड सामाजिक

बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले

बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले

बोगस आदिवासी जातीचे दाखले, जात पडताळणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे केले आवाहन

मोरोशी/ प्रतिनिधी :
बोगस आदिवासींच्या खुसखोरी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठाकर-ठाकूर नोकरवर्ग संघटनेने मोरोशी ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील ७ जिल्हयातील ठाकर-ठाकूर जमातीचे नोकरवर्ग, राजकिय पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विदयार्थी यांची संयुक्त मिटींग मुरबाड तालुक्यातील मोरोशी (दि. २७ सप्टें.) या ठिकाणी घेण्यात आली.
पूर्वीपासून आदिवासी जमातीचे जातीचे दाखले, जात पडताळणी बोगस आदिवासींनी अनेक मार्गाने मिळवून आपल्या हक्काच्या जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे खरे आदिवासी अनेक सरकारी नोकऱ्या, अनेक लाभापासून वंचित आहेत. परिणामी, खऱ्या आदिवासी सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यासाठी सर्व आदिवासी समाजाने जागृत होऊन यापुढे बोगस लोक जातीचे दाखले, जात पडताळणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनात आल्यास त्वरीत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अशा बोगसांना आपण अनेक मार्गानी रोखू शकतो. त्यातच अमरावती, ठाणे येथील हेरिंगला संघटनेचे पदाधिकारी पुराव्यानिशी उपस्थित राहून संबंधित दावे केलेल्यांना रोखण्यात संघटनेला मोठ य़श आले आहे. यापुढेही वेळ आल्यास आपण कोर्ट कचेरीचीही तयारी केली असून यासाठी निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी ७ ही जिल्हयातील नोकरवर्ग तसेच राजकिय, सामाजिक, क्षेत्रातील काम करणा-यांचा प्रयत्न आवश्यक आहेत.
तसेच कोर्ट केससाठीच्या निधीसाठी संघटनेची सभासद, मदत, देणगी पावती फाडून बोगसांना रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे महाराष्ट्र राज्य ठाकर-ठाकूर नोकरवर्ग संघटनेचे सचिव कांताराम खंडवी यांनी केले. या मिटिंगकरिता ७ जिल्ह्यातील १५९ पदाधिकारी उपस्थित असतांना बोगसांविरूदध लढण्यासाठी कर्जत तालुक्याच्या वतीने मदत म्हणून रु.२५०००/- रुपये राज्य संघटनेला देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ठाकर-ठाकूर नोकरवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल् उघडे, सचिव कांताराम खंडवी, नवनाथ उघडे, मुरबाड पं.स.उपसभापती अरुणा खाकर, सामाजिक कार्यकर्ते इंजि. उत्तम डोके,अॅड.निवृत्ती काथोरे, गणेश पारधी, श्री. मोधे, बुधाजी हिंदोळा, दादा पादिर, जैतू पारधी, रविंद्र मेंगाळ, लक्ष्मण उघडे, दत्तात्रय हिंदोळे, देविदास हिंदोळे, शिवाजी मेंगाळ, मधुकर ढोले, लक्ष्मण पादिर, मालू निरगुडा, पथवे, श्री. वाघ, खाकर रवींद्र मेंगाल, बाळू गावंडे, मारुती पवार, शिवाजी मेंगाल, संतोष मेंगाल, संजय मोधे, सुनील घोगरे, आदि. पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply