IMG-20201102-WA0050
कर्जत ठाणे मुरबाड सामाजिक

मुरबाड येथील तागवाडी या आदिवासीवाडीतील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मेंगाळ कुटुंबाना केली आर्थिक मदत

मुरबाड येथील तागवाडी या आदिवासीवाडीतील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मेंगाळ कुटुंबाना केली आर्थिक मदत.

कर्जत/ मोतीराम पादिर :
विशेष प्रतिनिधी/ नितीन पारधी :
मुरबाड तालुक्यातील तागवाडी येथील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा दुदैवी मृ़त्यू झाला. या माहिलेला ४ महिन्याचे लहान बाळ आहे. बाळाच्या डोक्यावरच आईच छत्र गेले. हि दुदैवी घटना समजताच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक, आरोग्य विषयक खूप चांगले कामे करते. संस्था, सदस्य पंकज पवार, सज्जन जमदरे यांना ही घटना मोबाईलच्या संदेशाद्वारे झूगरेवाडी येथील पोलीस पाटील जनार्दन पारधी यांनी सामजिक बांधिलकी म्हणून कळिवल्याने लगेच दुसऱ्या दिवशी या घटनास्थळी जाऊन त्या कुटुंबाला भेट दिली.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सांबरे यांनी या कुटुंबास २५, ०००/- रूपयांची मदत म्हणून जाहीर केलेली होती. जाहिर केलेली रक्कम दिनांक ०२/११/२०२० रोजी या मेंगाळ कुटुंबाला २५०००/- रूपये रक्कम देऊन कुटुंबाला आधार दिला. यावेळी जिजाऊ संस्थेचे सदस्य सज्जन जमदरे, संजय कुर्ले, अभय कुर्ले, झुगरेवाडी पोलीस पाटील जनार्दन पारधी, दिवेश धवळे, दिनेश कुर्ले, अभिजीत शिंदे, मा. सरपंच गजानन कडाळी, रमण हिंदोळा, यांच्या हस्ते सुपूर्त करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

Leave a Reply