20201105_100248
संपादकीय

पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..??

पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..??

श्रीम. आहिरराव यांनी फोन न उचलने व प्रतिक्रिया न दिल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर

प्रकल्प कार्यालयात सामान्य आदिवासींचे विकास कामे व योजनांना लागतो विलंब; माञ राजकीय पुढा-यांची कामे होतात झटापट!

पेण/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे विकास साधण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी विभाग तयार करून जिल्हा प्रमाणे प्रकल्प कार्यालयाची रचना केली आहे. त्या प्रकल्प कार्यालयापैकी पेण हे एक एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय आहे. या प्रकल्प कार्यालयात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाचा समावेश होतो.
मात्र, हे कार्यालय पेण तालुक्यात असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, अलिबाग, सुधागड- पाली अन्य तालुक्यातून व जिल्ह्यातून येण्यासाठी अनेक आदिवासी बांधव व कार्यकर्ते प्रकल्प अधिकारी श्रीम. आहिरराव यांना कार्यालयात भेटण्यासाठी फोन करून येतात. आदिवासींचे विकास कामे, आश्रमाशाळेचे प्रश्न, वसतीगृहाच्या अडचणी, आदिवासींच्या योजना, सद्या खावटी योजना असतील? असे अनेक अडचणी घेऊन येत असतात. जेणेकरून प्रकल्प अधिका-यांशी भेट होईल आणि समाजातील बांधवांची कामे होतील. माञ, कार्यालयात भेट न झाल्याने अनेक बांधवाचा वेळ आणि खर्च वाया जातोय. असे असतांना देखील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील प्रकल्प अधिकारी श्रीम. आहिरराव यांना अनेक आदिवासी कार्यकर्त्यांनी फोन केला की, फोन बीझी दाखवतो. एंवढच नाही तर कधी त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत नाही. माञ, ठराविकच लोकांना प्रतिक्रिया देत असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्प कार्यालयातून आदिवासींचे पश्न, अडचणी, विकास कामा संदर्भात चर्चाच होत नसेल तर विकास कामे कसे होतात? मग, सामान्य आदिवासी बांधवांना प्रश्न पडतोय पेणच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कामकाजात बीझी असतात का? फोन बीझी असतो.
त्यामुळे रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले कार्यकर्त्यांचा वेळ वाया जात असून येण्या- जाण्याचा खर्च सुद्धा वाया जातो. शिवाय, प्रकल्प कार्यालयात सामन्य आदिवासींचे विकास कामे व योजनां राबवण्यासाठी मोठा विलंब लागतो. तर प्रकल्प कार्यालयातील ठेकेदार आणि राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने ठराविकच लोकांची कामे झटापट होतांना दिसताहेत. त्यामुळे प्रकल्प अधिकारी श्रीम. आहिरराव यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. या सर्वाचा विचार करून आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त, आयुक्तांनी अधिक लक्ष द्यावे, असे येथील आदिवासी बांधवांची मागणी आहे.

Leave a Reply