20201108_231017
कर्जत ताज्या रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघ, (ASS) रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांच्या संकल्पनेने कर्जत – नेरळ येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी

आदिवासी सेवा संघ, (ASS) रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांच्या संकल्पनेने कर्जत – नेरळ येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी

आदिवासी सेवा संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीचा पुढाकार

□ आदिवासी वाडीत दिपावली फराळ.
□ इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक वस्तूंचे वाटप.
□ महिला वर्गांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
□ महिलांना दिवाळी व भाऊबीज म्हणून साडी वाटप.

नेरळ/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज (दि. ८ नोव्हें. २०२०) जयंती असल्याने समाज अनेक ठिकाणी राघोजी भांगरे यांची जयंती साजरी केली जाते. आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीने कर्जत- नेरळ येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची २१५ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्षा भगवान भगत, सचिव गणेश पारधी व कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी यांनी समाजोपयोगी विषय व समाजात संघटन का? असावे याचे महत्व पटवून दिले.

शिवाय, रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या संकल्पनेने कर्जत येथील एकनाथ या आदिवासी वाडीत दिपावली फराळ व इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक वस्तूंचे वाटप, महिला वर्गांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांना दिवाळी व भाऊबीज म्हणून साडी वाटप करण्याचे ठरवले असल्याचे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळे (तात्या) यांनी सांगितले आहे.
यावेळी आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत, जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी, तालुका उपाध्यक्ष बाळू ठोंबरे, तालुका सचिव जयराम उघडे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply