IMG-20201115-WA0004
कर्जत ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार

बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार

बॅंकेच्या मनमानी कारभारामुळे कशेळे भागातील खातेदारामध्ये संताप

—————————
बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेवर खातेदार संताप व्यक्त करीत असून बॅंकांनी कार्यालयीनच्या वेळेत कामकाजात केले पाहिजे, शिवाय अडाणी, अशिक्षीत असणारे खातेदार यांना बचत खाते उघडणे, पैसे भरणे – काढण्यासाठी तसेच शेतक-यांना लागणारे कर्ज, गरिब आदिवासी बांधव खुप अंतरावरून येतात. त्यांना तहसील व कृषी विभागाच्या योजना मिळत असतात त्यासाठी बॅंकेच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी त्यांना मद्दत केली पाहिजे. बॅंकेवाले पगार घेतात त्यांची जान ठेवा, आशा भाषेत येथील जेष्ठ नागरीक उदय पाटील यांनी बॅंकेच्या मॅनेजर व कर्मचा-यांना खडसावून सांगितले.
————————-

कर्जत/ मोतीराम पादिर :
कशेळे हा संपूर्ण ग्रामिण भाग असून या परिसरात अनेक आदिवासी गावं, वाड्यांचा समावेश आहे. कशेळे येथे अनेक वर्षांपासून बॅक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून अनेकांचे खाते या बॅंकेमध्ये आहेत.
बचत खातेसह तहसील, कृषी विभाग व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणेसाठी अनेक आदिवासी बांधवांचे व शेतक-यांचे बचत खाते या बॅंकामध्ये आहेत. माञ, बॅंकच्या मॅनेजर व बॅंकेच्या कर्मचा-यांना विसर पडला आहे. बॅंकच्या कार्यालयीन वेळेत येथील कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातून आलेल्या खातेदारांना तासोंतास वाट पहावी लागत असते. एखाद्या अडाणी, सुशिक्षित नसलेल्या ग्रामस्थांना नवीन बचत खाते उघडण्यासाठी किंवा आपले पैसे भरणे, काढणे आदिवासी खातेदारांना शिक्षणाअभावी जमत नसल्याने आशा वेळी बॅंकेच्या कर्मचा-यांनी आदिवासी बांधवांना मद्दत करणे अपेक्षित आहे, असे असतांना देखील उलट बॅंकचे कर्मचारी त्या खातेदारांना अरे तुरेची भाषा वापरत खातेदारांना बॅंकेच्या बाहेर काढले जाते.
त्यामुळे बॅंक ऑफ महाराष्ट्र यांची कशेळे येथे शाखेवर खातेदार संताप व्यक्त करीत असून बॅंक कार्यालयीनच्या वेळेत कामकाजात केले पाहिजे, शिवाय अडाणी, अशिक्षीत असणारे खातेदार यांना बचत खाते उघडणे, पैसे भरणे – काढण्यासाठी तसेच शेतक-यांना लागणारे कर्ज देण्यात बॅंकेच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी मद्दत केली पाहिजे, अशी मागणी कशेळे परिसरातील बांधव करीत आहेत.

Leave a Reply