IMG-20201121-WA0079
ताज्या नवी मुंबई

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद.. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ची दमदार कामगिरी

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ची दमदार कामगिरी

तब्बल २० गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

पनवेल/ राज भंडारी :
सोन्याची साखळी चोरणाऱ्या तब्बल २० गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश मिळाले आहे. नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर अवघ्या १० दिवसात एकूण तीन गुन्ह्यांची उकल केली. यामध्ये लुटमार, खूनासारख्या अती भयंकर आणि किचकट अशा गुन्ह्यांमध्ये आपले कौशल्य पणाला लावून त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ०१ आणि परिमंडळ ०२ मधील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात चैन स्न्याचींग सारखे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर येत होते. यापूर्वी फैयाज शेख या गुन्हेगाराला पोलिसांच्या धाडसी पथकाने अटक केली होती. त्यावेळी पोलिसांसोबत अग्निशस्त्रा द्वारे चकमक झाली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून फैयाज याला अटक केली होती. किरकोळ गुन्हे जरी वाटत असले तरी या गुन्हेगारांची हिम्मत कोणत्याही थराला जात असते.
नुकत्याच युपी मधील गुन्हेगार विकास दुबेचे प्रकरण ताजे आहे. गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या पथकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक चौकशी करण्यात आल्यानंतर तब्बल २० गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्याकडून २ मोटार सायकल आणि ३८ तोळे सोने असे एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तन्वीर मोहम्मद इब्राहिम शेख ऊर्फ दीपक, अखिल शरीफ खान, तरशरुफ ब्रैद्दुर रहमान शेख, सर्व रा.मानखुर्द, मुंबई, शबनम शब्बीर शेख आणि हरून लाला सय्यद दोघेही रा.पनवेल अशी असून त्यांच्यावर भा.दं.वि.कलम ३९२, ४११, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गिरिधर गोरे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केले आहे.

Leave a Reply