20201218_200515
ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र रत्नागिरी रायगड रायगड सामाजिक

पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर… पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार

पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर

पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार

मालडूंगे/ सुनिल वारगडा :
आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या अनेक योजना असतात. कोरोनाच्या काळखंडामध्ये आदिवासी समाजातील गोर गरिब, जेष्ठ नागरिक, रोजगार हमीतील कुटूंब, वन हक्कधारकांना शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खावटी योजना लागू केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येकी कुटूंबाला 2,000 रूपांंचे जिवनाश्यक वस्तू तर 2,000 रोख रक्कम आपल्या बँक खात्यात शासन जमा करणार असल्याने आदिवासी विकास विभागामार्फत अनेकांचे अर्ज भरण्यात आले होते. खावटी योजनेत पात्र कुटूंबांना आता आपले खाते पोस्ट ऑफिसमध्ये आवश्यक आहे. त्याकरीता पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी गर्दीच गर्दी होत असल्याने खावटी योजनेत पात्र कुटूंबांकरिता पोस्ट आफिसर व आदिवासी सेवा संघ पनवेल यांनी पुढाकार घेवून धोदाणी परिसरातील ग्रामस्थांसाठी मालडूंगे- ताडपट्टी येथे शिबीरांचे आयोजन केले होते.
यावेळी पोस्ट आफिसचे अधिकारी सुशिल अहिरे यांनी सर्व खातेधारकांना पोस्ट ऑफिसची माहिती देवून पोस्ट बचत खातेचे महत्व पटवून दिले. यावेळी आदिवासी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, पोस्ट आफिसचे कर्मचारी श्री. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते हनुमान पोकळा, वाजे येथील पोस्टमन श्री. भालेकर, मा. सरपंच चाहू चौधरी, मैद्या चौधरी आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply