IMG-20201223-WA0032
ताज्या नवी मुंबई

नेरूळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविणार “फुड किंग “… दिमाखात उदघाटन, दणकेबाज एन्ट्री

नेरूळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविणार “फुड किंग “

दिमाखात उदघाटन, दणकेबाज एन्ट्री

पनवेल/ वार्ताहर : नेरुळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी “फुड किंग” या नेरूळी ब्रॅण्डने बाजारात आज दिमाखात एन्ट्री घेतली. तरूण सामाजिक कार्यकर्ते सतिश लोके यांनीच “फुड किंग” द्वारे हाॅटेलिंग क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांच्या या हाॅटेलचे उदघाटन क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सय्यद अकबर आणि एपीआय समीर शेख यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
पनवेलमधील युवा सामाजिक कार्यकर्ते सतिश लोके यांचे हाॅटेलिंग हे फार पुर्वी पासूनचे स्वप्न. ते साकारताना त्यांनी स्वतःचा “फुड किंग” हा ब्रॅण्ड आणला आहे.
‘चवीचे खाणार त्याला “फुड किंग” देणार’ हेच त्यांच्या ब्रॅण्डचे ध्येय असून स्नॅक्स, जेवण आणि पार्टी ऑर्डर सुध्दा परिपूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. कोरोनाचे भय असतानादेखील त्यांनी या उपक्रमात हात घातला आहे. हाॅटेल छोटेसेच असले तरी स्वच्छतेचे पालन कटाक्षाने करत चांगले आणि चवदार खाद्यपदार्थ देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आवर्जून सतिश लोके यांनी उद्घाटनानंतर सांगितले.
सामाजिक कार्य तळमळीने करत यशस्वी झालेले सतिश लोके याही बाबतीत त्यांच्या त्याच तळमळीमुळे यशस्वी ठरतील अशी खात्री व्यक्त करत पत्रकार सय्यद अकबर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक समीर शेख यांनीही त्यांचे मनापासून कौतुक केले तर उपस्थित मान्यवरांसह सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply