20201230_202418
नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे

पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे

पेण/ राजेश प्रधान :
पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून त्या दृष्टीने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी कार्यवाही करण्याच्या सूचना डी.आय.जी संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. शासनाच्या मनोधैर्य योजनेतून मदत करण्याचे आदेश यावेळी प्रांत विठ्ठल इनामदार यांना दिले. त्याचप्रमाणे पिडीतेच्या कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यात करिता कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. समाजामध्ये अपप्रवृत्ती वाढत असून पोलिसांचा धाक कमी झाला आहे अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरिता पोलिसांनी त्यांचा धाक कायम ठेवणे गरजेचे आहे तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याकरितां पोलिसांनी कारवाई करावी असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना कायम असून त्यांना शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तालुकाप्रमुख आविनाश म्हात्रे यांनी दिले. यापूर्वीही या आरोपीने अपहरण व बलात्कार या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे तो अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असून त्याला कठोरात कठोर शासन करून नंतर फासावर लटकवा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी केली.

Leave a Reply