20210104_161413
पश्चिम महाराष्ट्र सामाजिक

खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू

खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद

पनवेल/ संजय कदम :
कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने त्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे.
खैरणे गावात असलेल्या पाण्याच्या खदानीत कपडे धुण्यासाठी सुरवंता खंडू माने (28) या गेल्या असता त्यांचा पाय घसरल्याने त्या खदानीत पाण्यात पडल्या. त्यात त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply