IMG-20210220-WA0024
कर्जत ताज्या सामाजिक

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे ‘गुंज’ संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू व शालेय शैक्षणिक साहित्यांचा वाटप

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे ‘गुंज’ संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू व शालेय शैक्षणिक साहित्यांचा वाटप

कर्जत/ मोतीराम पादिर :
कोरोनाच्या काळामध्ये सर्व भारतभर लोकांनवर खुप मोठे संकट कोसळले त्यावेळी बरेच संघटना, सामाजिक संस्थांने त्या वेळेस मदतीचा हात दिला.
असाच मदतीचा हात गुंज या संस्थेने कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचीवाडी येथे जीवनावश्यक वस्तू व शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांच्या मार्फत गुंज या संस्थेला ऐनाचीवाडी गावामध्ये घेऊन येत असतांना गुंज संस्थेचे पदाधिकारी अंनत खरे यांनी प्रथम गावातील सर्व ग्रामस्थांची भेट घडवून दिली. या भेटीने अंनत खरे यांनी गावातील लोकांना मार्गदर्शन केले व शाळेचे मुख्यध्यापक यांना संस्थेचे कार्यपद्धती तसेच संस्था मार्फत श्रमदानातून काम कसे करावे या बदल मार्गदर्शन केले. सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन शाळेचे मुख्यध्यापक लक्ष्मण पादीर, नवीन हेमावत तसेच राम वारघडा, सचिन निरगुडा, प्रभाकर वाघ, पांडूरंग मुकणे, सुरेश झुगरे या तरुणांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून गावाची साफसफाई केली. नदीवर जाणार रस्ता साफ केला गावाजवळ बस स्टॅड बाधून सर्व गावाची साफसफाई केली.
श्रमदानातून हे काम झाल्यावर संस्थेचे अंनत खरे यांनी शुक्रवार (दि. १८ फेब्रु.) रोजी ऐनाचीवाडी शाळेतील विद्यार्थाना बॅग, पेन, पेन्सिल, पाणी बॉटल, अशा शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यांनतर वाडीतील सर्व कुंटूबांना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ कृष्णा शिंगोळे, राम वारघडा, कैलास लचका, पांडूरंग मुकणे प्रभाकर वाघ सचिन निरगुड सुरेश झुगरे, निलेश मेंगाळ, दिनेश मेंगाळ नाना पादीर, चंदन पादीर, सुरज पादीर, रमेश शेळके, अनिल वारघडा काशिनाथ पादीर आदी. उपस्थित होते.

Leave a Reply