20210224_093128
कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई पनवेल पालघर महाराष्ट्र सामाजिक

शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!

आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षनामुळे शिक्षणासाठी विद्यार्थींना करावा लागतोय संघर्ष

शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!

पनवेल/ प्रतिनिधी :
लाॅकडाऊन नंतर राज्य शासनाने राज्यातील विद्यालये चालू करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालये देखील चालू झाले. माञ, या विद्यालयामध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच राहिल्याने आजही वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत शिक्षणासाठी संघर्ष करत असलेल्या एका मुलीला जीव गमवावा लागल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. जेवणाची सोय नाही, राहण्याची सोय नाही, यामुळे नर्सिंगचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागेल याचा विचार करत बसलेल्या सुजाता लिलका या आदिवासी तरुणीची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यु झाला असल्याचा आरोप जात आहे.
सुजाता लीलका ही पनवेल येथील वाय. टी. एम. नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. कोरोनाच्या संकटामुळे आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, मेस अजून सुरू केलेले नाहीत. मात्र नर्सिंग कॉलेज सुरू होते. त्यामुळे इथे शिकणाऱ्या 7 मुलींनी मिळून एक रुम भाड्याने घेतली होती. सुजाताही त्यामध्येच राहत होती. मात्र घर मालकाने एवढ्या मुलींना एकत्र राहता येणार नाही, असे सांगितल्याने या मुलींनी आदिवासी समाजाच्या हॉस्टलमध्ये राहता यावे यासाठी विनंती देखील केली होती. मात्र कोविडमुळे हॉस्टेल बंद असल्याचे सांगण्यात आले. सुजाता आणि तिच्या दोन मैत्रीणींनी पनवेलमध्ये दुसरी रूम शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र अविवाहित मुलींना रूम मिळणे कठीण होते आणि भाड़े देखील परवडणारे नव्हते. त्यात सुजाताचे आई वडील डहाणूमध्ये हात मजूरी करतात. तिला दोनं बहिणी असल्याने एवढा खर्च करणे तिच्या आई वडिलांना शक्य नव्हते. मग या मुलींनी कॉलेजमधून घरी जाण्यासाठी परवानगी मागितली. पण रोज कॉलेजमध्ये यावे लागेल असा नियम असल्याने सुजाता आणि तिच्या मैत्रीणींचा धीर सुटल्याचे सांगितले जात आहे. अखेर जेवणाची- राहण्याची सोय नाही. म्हणून त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस रडून रडून सुजाता एकदम गळून गेली होती. एका मैत्रिणीने रिक्षा थांबवली पण त्या आधीच सुजाता कोसळली. मैत्रिणींना तसेच तिला हॉस्पिटलमध्ये नेले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. जर आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह चालू असते तर अशी दुर्घटना थांबली असती, हे निश्चितच!

Leave a Reply