20210321_182511
ताज्या नवी मुंबई पनवेल

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

 

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील पडघे परिसरात राहणाऱया एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच भागातील एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या घटनेतील अल्पवयीन मुलाला बलात्कार व पोक्सोच्या कलमाखाली ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.
या घटनेतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा व पिडीत मुलगी हे दोघेही एकाच भागात राहाण्यास असून दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाने पिडीत मुलीला जबरदस्तीने आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलीचा तिच्या आईकडून शोध घेण्यात येत असताना, ती सदर मुलाच्या घरामध्ये सापडली. त्यानंतर सदर मुलाने आपल्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पिडीत मुलीने आपल्या आईला दिली.
त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने सदर मुलाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Leave a Reply