IMG-20210323-WA0035
ताज्या पनवेल सामाजिक

पवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने

पवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने

पनवेल/ प्रतिनिधी :
वाढदिवस म्हटले की आजकाल पार्टी, केक, रेलचेल, फुगे इत्यादी गोष्टी सहज येतात; परंतु सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. याचा विचार करुन ‘किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कुल’, उमरोलीचा विद्यार्थी कु.पवन भगत याने घरातील सर्वांना सांगितले माझा वाढदिवस मला साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे.
पवन भगतला वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क वाटायची आहेत. त्याने आपल्या वाढदिवसाला हा संकल्प केला. हा संकल्प यशस्वी झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री. यशवंत बिडये, संस्थापक श्री.संतोष पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या त्याचे कौतुक केले गेले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.बिडये यांनी शाळेत वेगळी प्रथा सुरु केली आहे.
तसेच वडिलांनी मागिल महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला त्यावेळी सरस्वतीची मुर्ती शाळेला भेट दिली. हा वाढदिवस कोविडचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे या शाळेचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे व संस्थापकांचे या परािसरात कौतुक होत आहे.

Leave a Reply