20210421_150659
संपादकीय

सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा

सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा

 

पनवेल/ संजय कदम :
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे माजी अध्यक्ष,सिटी बेल चे समूह संपादक तथा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोल्डन ग्रुपचे सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील यांचा जन्मदिवस पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणू चे सावट असल्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी विवेक पाटील यांच्या कार्याचा व पत्रकारिता क्षेत्रातील प्रवासाचा आलेख उपस्थितांसमोर विशद केला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सोशल डिस्टंसिंग चे सारे नियम पाळत विवेक पाटील यांना पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या तमाम सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
पत्रकार विवेक पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष निलेश सोनावणे, उपाध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष प्रवीण मोहोकर, खजिनदार हरेश साठे संजय कदम, मंदार दोंदे, रवींद्र गायकवाड, दीपक महाडिक, संतोष सुतार, वचन गायकवाड,राजेंद्र कांबळे,आशिष साबळे,कैलास कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply