IMG-20210713-WA0008
कर्जत ताज्या नेरळ राजकीय रायगड

कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड

कर्जत पंचायत समिती उपसभापती पदी सौ. जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची निवड

कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड सोमवार (दि. १२ जुलै) रोजी करण्यात आली.
शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने युती करून उपसभापती पदी सौ.जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांची नियुक्ती केली. यावेळी खालापूर कर्जत मतदार संघातील आमदार महेंद्र थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तसेच कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पंचायत समितीच्या सदस्या सौ. जयवंती हिंदोळा यांची समाजाबद्दलची असणारी चळवळ व एक निष्ठा असल्यानेच कर्जत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळाले असल्याचे बोलले जाते. समाजातील बांधवाच्या सुख दु:खात, अडी-अडचणीत उपस्थित राहून धीर व पाठबळ देण्याचे कार्य करीत असतात. रस्ते, पाणी पुरवठा सारख्या योजना, सभामंडप, अंगणवाडी, शाळा दुरूस्ती अशी अनेक कामे मार्गी लावून बचत गट, शेतकरी, अंध, अपंग, निराधार यांना स्वंयरोजगारासाठी निधी -साहित्याचे वाटप अशा अनेक महत्त्वपूर्ण कामे देखील पंचायत समितीच्या सदस्या सौ. जयवंती हिंदोळे यांनी केले आहे.
कर्जत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळताच आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सौ. जयवंती दत्तात्रेय हिंदोळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येते.

Leave a Reply