संपादकीय

आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारणीची सर्वसाधारण सभा संपन्न

कोरोनासारख्या महामारी रोगावर मात करा- रायगड जिल्हा अध्यक्ष, बुधाजी हिंदोळे (तात्या)

कर्जत/मोतीराम पादीर :
आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीची सर्वसाधारण सभा रविवार (दि. ११ जुलै) रोजी कशेळे येथे संपन्न झाली. कर्जत तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असताना खुप साऱ्या समस्या आदिवासी समाजा मध्ये आहेत. त्यामुळे आदिवासीचा विकास होणे गरजेचे असल्याने आदिवासी सेवा संघाने पुढाकार घेतला आहे.
या आदिवासी सेवा संघाने नव्याने उभारी देण्यासाठी आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळे (तात्या), जिल्हा उपाध्यक्ष भगवानशेठ भगत, जिल्हा सचिव गणेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली कशेळे तात्काळ मिंटीगचे आयोजन केले.
कोरोनासारख्या महामारी रोगामुळे व सरकारचे संभ्रमात टाकणारे लोकडाऊन यामुळे आदिवासी समाजाची अवस्था खुप बिकट झाली आहे. अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत, आदिवासी समाजाने जगायचे कसे?? हा प्रश्न पडला आहे. शिवाय, शासनाच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत कशा पोहचतील यासाठी संघटनेच्या सदस्यांनी काम केल पाहिजे. आपल्या सेवा संघाचा कार्यकर्ता तालूक्यातील प्रत्येक आदिवासी वाडी मधे सक्रिय झाला पाहिजे यासारखे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवाय, आदिवासी सेवा संघाचे कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करावा या आयत्यावेळेच्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष भगवानशेठ भगत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेसाठी आदिवासी सेवा संघाचे पदाधिकारी जैतु पारधी, बाळू ठोंबरे, विलासशेठ भला, गजानन भला, प्रसिध्दी प्रमुख मोतीराम पादीर लक्ष्मण दरवडा, सुरेश केवारी असे अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply