IMG-20210714-WA0071
संपादकीय

भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न


अलिबाग/ प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील उरण तालुका येथील भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा, उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे तसेच श्री. प्रशांत पाटील, सौ.भावना घाणेकर, सुरक्षा रक्षक कमिटीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील, संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
खाजगी सुरक्षा एजन्सीचे कंत्राट मूळ मालकाने रद्द केल्यामुळे सुमारे 113 सुरक्षा रक्षक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे थकीत भत्ते मूळ मालकामार्फत देण्याबाबत कामगार विभागाने कार्यवाही करावी तसेच भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा येथे कार्यरत असणाऱ्या खाजगी कंपनीने भविष्यात सुरक्षारक्षकांची नेमणूक करतेवेळी प्रकल्पग्रस्त म्हणून या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे व सुरक्षारक्षकांनी रायगड सुरक्षा रक्षक मंडळाममध्ये नोंदणी प्रक्रिया करावी, अशा सूचना यावेळी मंत्री महोदयांनी दिल्या.

Leave a Reply