FB_IMG_1627087763875
उरण कर्जत खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत

महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत

आदिवासी सम्राट/ प्रतिनिधी :
पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 चा महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना राजभवन येथील विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


काँग्रेसचे पनवेल कार्याध्यक्ष असणारे अभिजीत पाटील हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात असूनही कुठल्याच चित्रात दिसत नाहीत, हीच त्यांच्या कार्यशैली आहे. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांचे काम खूपच मोठे आहे, परंतु कुठल्याही कामाची चर्चा घडवून त्याचा गवगवा करणे हे त्यांच्या शैलीत न बसणारे, त्यामुळेच अभिजीत पाटील यांचे कार्य जनतेसमोर येत नाही, मात्र राष्ट्रीय पातळीवर त्याकार्याची दखल घेतली जात असते. त्यामुळेच त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्याचीही चर्चा त्यांनी घडवली नाही. परंतु फेसबुकच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचे समोर आले असून त्यानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply