IMG-20210729-WA0029
संपादकीय

कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत

कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत

कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, स्व रा. जनकल्याण समिती व गर्जे मराठी ग्लोबल फौंडेशन स्तूत्य सामाजिक उपक्रम


कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामूळे पुरात कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुंटूबांची घरे वाहून गेली या पुरात तीन आदिवासी कुंटूब बेघर झाली आहेत. पावसाचे पाणी शिरल्यामूळे प्रचड नुकसान झाले या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून कुशीवली येथील आदिवासी तीन कुटूंबाला मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. कॅबिनेट मंञी एकनाथ शिंदे, आमदार महेद्रं थोरवे, गर्जे मराठी ग्लोबल फौंडेशन व स्व रा जनकल्याण समितीचे आरोग्य रक्षक, आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्यकर्ते यांनी जीवनाश्यक वस्तूचे वाटप व आर्थिक मदत केली.

२९ जुलै रोजी सकाळी मंदार फनसे यांच्या सहकार्यने कुशीवली आदिवासी वाडी जीवनाश्यक वस्तूचे वाटप केले . येथील आदिवासी वाडीला पुराच्या पाण्याने प्रचंड नुकसान झाले तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व आर्थिक मदत करण्यात आली.आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र कर्जत रायगड सघटना यांनी पुढाकर घेऊन कार्यकर्ते बाळू ठोंबरे, भगवान भगत व आदिवासी सेवा संघाचे कर्जत तालुका प्रसिद्ध प्रमुख मोतीराम पादिर यांच्या पुढाकाराने वाटप केले. आर्थिक मदत उपलब्ध करून दिली यांच्या सामाजिक कामाचे विशेष कौतूक केले जात आहे. जीवनाश्यक वस्तू वाटपाच्या वेळेस उपस्थित आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिदोळा, उपध्यक्ष भगवान भगत, कर्जत तालुका उपाध्यक्ष बाळू ठोंबरे गजानन भला, काशिनाथ उघडा ( सरपंच) सुरेश दरवडा, संजय केवारी, किसन आदीर आदी. उपस्थित होते.

Leave a Reply