1630563129494_IMG-20210827-WA0027
ताज्या नवी मुंबई पनवेल पोलादपूर महाड सामाजिक

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत

पनवेल/प्रतिनिधी :
महाड, पोलादपूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी या गावावर दरड कोसळल्याने मोठया प्रमाणात जिवीत तसेच वित्त हानी झाली. एक महिना होवून गेला तरीही येथील जनजीवन सामान्य झालेले नाही. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पोलादपूर, महाड तालुक्यातील ज्या पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात कमी प्रमाणात मदत पोहचली अशा भागांची माहिती घेवून त्या गावांमध्ये जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच सध्या या ग्रामस्थांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेतल्या. 


पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे प्रत्यक्ष जावून मदत करत असताना तेथील नागरिकांना भेडसावत असणार्‍या समस्या जाणून घेतल्या. शासनाकडून खबरदारीचा भाग म्हणून येथील वस्ती दुसरीकडे हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. काहींनी तात्काळ घरे खाली करण्याच्या सूचना केल्याने पोलादपूर तसेच महाड या ठिकाणी भाडयाने घरे घेतली आहेत. तर सध्या या गावात राहणार्‍यांनी मात्र गणपती सण जवळ आल्याने आम्हाला गणपतीपर्यंत तरी येथे राहू द्यावे अशी ग्रामस्थांनी इच्छा बोलून दाखवली. तसेच शासनाने ज्या कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या कंटेनरमध्ये पाणी आणि शौचालयाची सोय नाही.  तसेच मोठया कुटूंबांसाठी हे कंटेनर सोयीचे नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पक्क्या घरांमध्ये शासनाने पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे. या ग्रामस्थांच्या मागण्या तसेच त्यांना भेडसावत असणार्‍या समस्या शासनापर्यंत पोहचवल्या जातील असे आश्‍वासन यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी दिले.

महाड, पोलादपूर तालुक्यातील पुरग्रस्त भागाला अनेक ठिकाणाहून मदती येत होत्या, मात्र दरडग्रस्त भाग याबाबतीत थोडा दुर्लक्षित राहिला होता. साखर सुतारवाडी हे गाव पोलादपूर पासून 15 किलोमीटर दूर दुर्गम अशा भागात आहे. पुरामुळे या गावापर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. अशा गावात मदत पोहचली खरी परंतु ती तुटपूंजी होती अशा महाड व पोलादपूर तालुक्यातील गावांचा शोध घेत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल मनोहर सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, प्रसिध्दप्रमुख संतोष सुतार, सनीप कलोते, ओमकार महाडिक, दिपाली पारस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply