IMG-20211002-WA0056
कळवण कोकण ताज्या दिल्ली नाशिक महाराष्ट्र मुंबई सामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व – केंद्रीय मंत्री भारतीताई पवार ….. लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व – केंद्रीय मंत्री भारतीताई पवार 

लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आणि जगासमोर मोठे संकट आले, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संकटकालातही देशाला सावरले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज (शनिवार, दि. ०२ ऑक्टोबर)  खांदा कॉलनी येथे केले. 

सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिराचे उदघाट्न केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कोरोना योद्धांचा सत्कार तसेच अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात.बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो.जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या ‘हाय रिस्क’ प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी या लसीकरण महाशिबिराचे दोन दिवस आयोजन करण्यात आले असून या महाशिबिरात किमान ०१ हजार मुलींचे लसीकरण होणार आहे.

नामदार भारती पवार यांनी पुढे म्हंटले कि, कर्करोगाचे वेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या देशात संख्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यामुळे त्याप्रमाणे त्यावर उपचार यंत्रणा राबविली जाते. भारतात कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्यावेळी तात्काळ उपचार करणे गरजेचे असून त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. महिला आरोग्यदायी तर कुटूंब सुदृढ अशी संकल्पना सत्यात आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने याबाबतीत जागरूक राहणे गरजेचे असून या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकार योग्य ती उपाययोजना करीत आहे. कोरोनाच्या काळात सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विचार करत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला. देशातील नागरिकाला मोफत लस देण्यासाठी त्यांनी ३५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले. आणि आपला भारत देश ८९ कोटी लसीकरण करणारा अव्वल ठरला. कोरोना महामारी विरोधात लढताना कर्करोग तसेच क्षयरोग दूर करण्यासाठी केंद्र सरकारचे आरोग्य विभाग कार्य करत आहे, त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने ५० कोटी लाभार्थी असून ०२ कोटी नागरिकांनी त्याचा लाभही घेतला आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून देशात ,मेडिकल कॉलजचे प्रमाण वाढले आहे आणि एकेकाळी सहा एम्स होत्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनातून बावीस एम्स निर्माण झाले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस आपला देश प्रगती करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवेचा वसा वृद्धिंगत करण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी ‘सबका साथ, सबका विश्वास, आणि सबका प्रयास’ महत्वाचा आहे असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात देशाच्या सीमेवर असलेल्या सैनिकांप्रमाणे कोरोना योद्धांनी काम केल्याचे सांगत त्यांच्याप्रती आदर व अभिमानही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सेवा अभियानातून विविध आरोग्य उपक्रम राबवित जीवांचे रक्षण करण्याचे काम होत असल्याचे अधोरेखित केले.
____________________

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजाप्रती असलेले योगदानाचा आढावा घेतला तर त्यांच्याविषयी बोलायला वेळ कमी पडेल. प्रचंड सामाजिक कार्याची जोड त्यांच्याकडे आहे. सतत समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून नेण्याचे काम केले आहे.
– नामदार भारतीताई पवार 
———————–

  लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर 

महाशिबिराचे निमंत्रक आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले कि, पनवेल नगरपालिका १८५२ साली स्थापना झाली. वाढती लोकसंख्या आणि आधुनिकरण लक्षात घेता महानगरपालिका झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निर्माण केली., असल्याचे आवर्जून नमूद केले.  देशातील प्रत्येक घटकातील, राज्यातील नागरिक पनवेल परिसरात वास्तव्यास आहेत. येथे असलेल्या मुली ह्या पनवेलच्या लेकी आहेत. त्यामुळे लेकींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपक्रमाचे आयोजन होत असून यापुढेही लेकींच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करणार आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धन्वंतरी संस्था स्थापन करून रुग्णांना सेवा व डॉक्टरांचा सन्मान करण्याचे केले जात आहे. त्यामुळे आजच्या या प्रयत्नातून मोठी झेप घेता आली आहे.  पूर्वी पनवेलला ३० खाटांचे शासकीय रुग्णालय होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदशनामुळे १३० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात भरीव मदत झाली. पालकमंत्री असताना रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजनांमधून तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे हे पनवेल उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उदघाटनांतर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित झाले आहे. त्यामुळे सेवा करणारे केंद्र म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य नागरिकांचे विचार करणारे आहेत, त्यामुळे विविध योजना अंमलात आणून देशाचा विकास करीत असल्याचे सांगतानाच कोरोना काळात जग संकटात असताना आपल्या भारत देशासह जगाला धैर्य देण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जगाला सक्षम नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी म्हंटले.


यावेळी महौपार डॉ. कविता चौतमोल यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले कि, कोरोनाच्या काळात सर्व घटकांना तळागाळात मदत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कोरोनाचा काळ वगळता गेल्या वर्षांपासून आरोग्य महाशिबिरे घेतली जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर कार्यकुशल आहेत आणि ते मोठ्या भावाप्रमाणे महिलांना सक्षम करण्याचे काम करीत असतात. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे आजचा हा उपक्रम होत असून पनवेमधील सर्व महिलांना अशा प्रकारच्या शिबिरातून लसीकरण करण्याचे काम ते करणार आहेत, असे सांगून पनवेल परिसरात माता व बाल संगोपन अद्ययावत केंद्रासाठी मदत करण्याची मागणी डॉ. कविता चौतमोल यांनी नामदार भारती पवार यांच्याकडे केली.
यावेळी व्यासपीठावर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील,  भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, ओमप्रकाश शेट्टी, राजेश सोमनार, डॉ. गिरीश गुणे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्षा वर्षा नाईक, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सीता पाटील, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, संजना कदम, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, कुसुम म्हाप्रमिला पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन, भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

——————-
#कोरोना योद्धा सन्मान – डॉ. गिरीश गुणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. विशाल किणी, डॉ. माधुरी दांडेकर, डॉ. आशिष गांधी, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अमित मायकर

———————-
#अंत्यविधी सेवक सन्मान – विनायक शेळके, दिलीप पाटील, नितीन करके, रमेश आखाडे, यज्ञेश सोनके.

Leave a Reply