IMG-20211103-WA0038
खारघर ताज्या पनवेल सामाजिक

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड

पनवेल/ प्रतिनिधी :
दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केल्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर अल्पवयीन मुलींबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह, सह. पोलीस आयुक्त जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, परिमंडळ 2, पनवेल, भागवत सोनावणे, सहा पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, पो.नि.गुन्हे जगदाळे, सपोनि मोनिका चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पारखे, पो.ना.पवार, पो.ना.शिंदे, म.पो.शि.शिंदे, पोशि पाटील आदींच्या पथकाने जुई गाव स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली, गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक शोध घेतला असता सदर आरोपी हे अल्पवयीन मुलींना घेवून भोसरी पुणे परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अपहरण मुलींच्या आईंना घेवून कामोठे पोलीस ठाण्याचे विशेष पथक सलग दोन दिवस त्या ठिकाणी वास्तव्यास राहून मोठ्या शिताफीने आरोपी आर्यन दिलीप चौधरी (23 रा.जुई गाव) व नेयाज अहमद हाशमी रा.भोसरी याला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply