IMG-20211107-WA0000
उरण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार

आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश.
– लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार

पनवेल/ प्रतिनिधी :

समाज चळवळीचे साप्ताहिक आदिवासी सम्राट या दिपावलीच्या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रश्न व अडी अडचणी नेहमी शासन दरबारी मांडण्याचेएक काम करतात असतात. शिवाय, गणपत वारगडा हे वृत्तपत्राच्या आणि आदिवासी संघटनेच्या माध्यमातून न्याय देत असतात. समाज प्रबोधन व जनजागृती करणे हाच त्यांचा उद्देश असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.


यावेळी दैनिक वादळ वाराचे संपादक, जेष्ठ पत्रकार विजय कडू , पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, दैनिक सामनाचे पञकार संजय कदम, पञकार श्री. नलावडे, साहिल रेळेकर, जयपाल सिंग, शाबीर शेख, विशाल सावंत, असिम शेख, इरफान आदी. पञकार उपस्थित होते.

Leave a Reply