IMG-20211113-WA0061
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन

शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन होत असतांना गुरूवारी (दि. ११ नोव्हें.) रोजी नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंञी ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते, उद्योग मंञी ना. सुभाष देसाई, मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संघटिका सौ. रेखाताई ठाकरे, रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, जिल्हा युवा अधिकारी मयुर जोशी, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक पनवेल परेश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत बहुजन समाज पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष शंकर सोनावले यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करून शिवबंधन बांधले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply