IMG-20211120-WA0059
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सरदार सरोवर

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय


पनवेल/ प्रतिनिधी :
तालुक्यातील कामोठे स्थित जवाहर इंडस्ट्रीज मधील एका विदेशी कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अल्प वेतनात राबवून त्यांना मूलभूत सोईसुविधापासून डावलले जात होते, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे तथा कामगार नेते भगवान ढेबे यांच्या ६ महिन्याच्या संघर्षानंतर कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. सदर आस्थापनेत सुमारे चारशे ते पाचशे कामगार दिवस-रात्र काम करत होते. त्यांची पिळवणूक होत होती, याविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री. ढेबे यांनी कामगारांच्या बाजूने कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करत त्यांच्याकडे दाद मागितली.


श्री. ढेबे यांच्या अथक प्रयत्नामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून ज्या कामगारांना किमान वेतन मिळत नव्हते, अशा कामगारांना माहे ऑक्टोबर 2021 पासून किमान वेतन लागू, त्याचबरोबर घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, दुप्पट दराने ओव्हर टाईम, दिवाळी बोनस, कामगार राज्य विमा योजना, भर पगारी रजा अशा अनेक सुविधा मिळवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये, अन्यायविरुद्ध संघटितपणे लढण्यासाठी संघर्षासाठी त्यांच्या संघटनेच्या कार्यालयांमध्ये येऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन श्री. ढेबे यांनी केले आहे.

Leave a Reply