IMG-20211231-WA0011
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेलचे पत्रकार सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्कार

पनवेलचे पत्रकार सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्कार


पनवेल /किरण बाथम :-
पनवेलचे पत्रकार तथा भाजप अल्पसंख्यांक नेते सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज बहुजन नायक पुरस्कार 2022 देण्यात येणार असल्याची माहिती नैशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टीस, महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात आली.
संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात 7 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते सदर पुरस्कार दिला जाणार आहे.सोलापूर व पश्चिम महाराष्ट्र परिसरात संस्थेचे मोठ्या प्रमाणात कार्य आहे.सामान्यजनांसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्था सन्मानित करते. यावर्षी राज्यस्तरावर तपासणी अंती सय्यद अकबर यांची निवड करण्यात आली.
सय्यद अकबर हे गेली 15 वर्ष पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात संतुलीतपणे सक्रिय आहेत. समाजकारण व राजकारण यांची सांगड घालत ते सामान्यांना न्यायहक्क मिळावा यासाठी आग्रही असतात. पनवेलच्या कोकण डायरी साप्ताहीकाचे ते संपादक आहेत. भाजप अल्पसंख्यांक विभागाचे ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आबालवृद्ध ते मान्यवर सर्वांमध्ये समरस होऊन समाजसेवा करण्याचा त्यांचा पिंड आहे.त्यांच्या या पुरस्काराचे सर्वांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply