IMG-20220105-WA0022
ठाणे ताज्या सामाजिक

वृक्ष तोड प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

वृक्ष तोड प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

डोंबिवली/ प्रतिनिधी :
कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील काटई गाव परिसरात वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभाग तसेच मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली मार्गावरील क डो मनपा हद्दीतील काटई गाव परिसरात असलेल्या बॉंबे टॉकीज समोरील विजय सागर हॉटेल च्या अगोदर काटई गावातील रामदास चौधरी यांची खाजगी जमीन आहे.
चौधरी यांच्या जमिनीवर असलेल्या निलगिरी व कारंजाच्या झाडाची कोणीतरी अज्ञात इसमाने मशीनच्या साहाय्याने कत्तल केली असून, आजूबाजूच्या इतर झाडांची देखील कत्तल करण्यात आल्याने चौधरी यांनी बुधवारी ( ता.28 डिसेंबर ) रोजी मानपाडा पोलीस ठाणे तसेच क डो मनपा उद्यान विभागात अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल केली असून, वृक्षतोडी करणाऱ्यांविरोधात कारवाई करन्याची मागणी केली आहे.दरम्यान डेरेदार आणि जुने वृक्ष तोडण्यात आल्याने परिसरातील पर्यावरण प्रेमिनी संताप व्यक्त करून प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी अशी भावना व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply