IMG-20220105-WA0033
अलिबाग ताज्या नवीन पनवेल पनवेल रायगड सामाजिक

पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती… शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं?.. महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता!

पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती

शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं?

महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता!

गणपत वारगडा/ पनवेल :
तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम ही महसूल खात्यामध्ये खुप महत्वाची समजली जातेय. तालुक्यातील शेतक-यांचे ६० ते ७० वर्षाचे पुरावे, सात बारा उतारे, फेरफार, तहसील मार्फत चालवल्या जाणारे खटले यांचे पुरावे व आदेशाची नकला या सारखे अनेक कागदपत्रे रेकॉर्ड रूमध्ये सुरक्षित म्हणून ठेवली जातात. त्याकरिता देखरेख व कामकाज करण्यासाठी रेकॉर्ड रूमध्ये ठराविकच शासकीय कर्मचारी असतात.
माञ, असे असतांना देखील रेकाॅर्डमध्ये खाजगी व्यक्तीच काम करतांना दिसताहेत. त्यामुळे महसुलच्या दप्तरी असणा-या रेकाॅर्ड रूम मधून महत्त्वाची कागदपत्रे, फेरफार, आदेश नकला गहाण झाल्यास अथवा नष्ट केल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना वारंवार भ्रमणध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी व्यस्त असल्याचे दिसून येत होते. एवढंच नाही तर तहसील कार्यालयातील दोन्ही ही नायब तहसीलदार कार्यालयात नसल्याचे दिसून आले.

Leave a Reply