20220113_201917
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विशेष लेख..✒️

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे.

त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा महामहोत्सव सुरु झाला आहे. जिल्ह्यात नागरी सुविधा केंद्रामार्फत ऑक्टोबर 2021 पासून नोंदणीचे कामकाज सुरु करण्यात आले असून आतापर्यंत 78 हजार 270 असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करण्यात आली आहे.      

जिल्ह्यातील ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि रायगड कामगार उपायुक्त श्री. प्र.ना.पवार यांनी केले आहे.
योजनेचे लाभ :-
  ● असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
  ● शासन असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
  ● शासनाला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.
 ● कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिला जाईल.
  तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.
असंघटित कामगार म्हणजे कोण?:-
            लहान आणि सीमांत शेतकरी/शेतमजूर, पशुपालन करणारे, सेल्समन, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, किराणा/बेकरी/पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार, आशा वर्कर, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खाजगी क्लासेस संचालक, विडी कामगार यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही, म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. ई- श्रम (E-SHRAM ) कार्ड  (आधारकार्ड सारखे कार्ड ) देणार आहे. ज्यामुळे या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.
ई-श्रम नोंदणीसाठी निकष :-
Ø  संबंधित व्यक्ती 18 ते 59 वय असणारी असावी,
Ø  ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी,
Ø  ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी,
Ø  वर नमूद कामगार क्षेत्रात काम करणारी असावी.
ई- श्रम नोंदणीसाठी  लागणारी कागदपत्रे :-
ü  आधार कार्ड,
ü  मोबाइल नंबर,
ü  बँक पासबुक,
ü  शैक्षणिक माहिती
            असंघटित कामगारांची आपली आणि आपल्या कुटूंब सदस्यांची ई-श्रम कार्ड नोंदणी करून घेवून विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि रायगड जिल्हा कामगार उपायुक्त श्री. प्र. ना.पवार यांनी केले आहे.यांनी केले आहे.
– मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग

Leave a Reply