20220114_165445
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड रायगड

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर

मुंबई/ प्रतिनिधी :
दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.   राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

Leave a Reply