IMG-20220114-WA0101
ताज्या पनवेल सामाजिक

आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप

आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप

पनवेल / प्रतिनिधी :
मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. तसे पाहिले गेले तर पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये पडल्याने शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. याव्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो. सध्या कोरोना विषाणूमुळे मकरसंक्रांतीच्या सणाला पतंग महोत्सव आयोजन करण्याला बंदी असली तरी पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते केवल महाडिक यांच्या माध्यमातून आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनच्या माध्यमातून गरीब वस्तीतील लहान मुलांना मोफत पतंगांचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी परिसरातील नागरिकांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बच्चे कंपनीने पतंग घेण्यासाठी रांग लावल्याचे पहावयास मिळून आले. सदर उपक्रमास अध्यक्ष केवल महाडिक, ओमकार महाडिक, इस्माईल तांबोळी, कमलाकर शेळके व पत्रकार सचिन वायदंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply