IMG-20220116-WA0030
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत

उरण/ प्रतिनिधी :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरु केले आहे. या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्ष्यांची बैठक रायगड काँग्रेसचे अध्यक्ष सन्मा. महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली समाजमंदिर हॉल, शेलघर येथे आज पार पडली.
प्रदेशाध्यक्ष सन्मा. नानाभाऊ पटोले यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सन्मा. सोनियाजी गांधी यांना देशात महाराष्ट्र राज्य सभासद नोंदणीत एक नंबरचे राज्य असेल असे वचन दिले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील युवकांना व महिलांना सभासद नोंदणीत मोठया प्रमाणात सहभागी करून राज्यात रायगड जिल्हा सभासद नोंदणीत अव्वल आणणार असा विश्वास रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी या बैठकी प्रसंगी दिला.
या बैठकी साठी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष -मिलिंद पाडगावकर, माजी जि. प.सदस्य -डॉ. मनिष पाटील, अल्पसंख्यांक कोकण विभाग अध्यक्ष -अखलाक शिलोत्री, सरचिटणीस -श्री. गणेश सेवक, अलिबाग ता. अध्यक्ष -योगेश मगर, पेण ता. अध्यक्ष -अशोक मोकल, पनवेल ता. अध्यक्ष – महादेव कटेकर, खालापूर ता. अध्यक्ष -नाना म्हात्रे, माथेरान गिरीस्थान अध्यक्ष -मनोज खेडेकर, कर्जत ता. अध्यक्ष -मुकेश सुर्वे, रोहा ता. अध्यक्ष -सुनील देशमुख, मुरुड ता. अध्यक्ष -सुभाष महाडिक, माणगाव ता. अध्यक्ष -विनोद सुर्वे, खोपोली शहर अध्यक्ष -श्री. जॉन तसेच इतर सर्व तालुका व शहरअध्यक्ष उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासित केले.

Leave a Reply