IMG-20220217-WA0107
अक्कलकुवा ताज्या दिल्ली महाराष्ट्र सामाजिक

राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन

राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन

अक्कलकुवा/ प्रतिनिधी :
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा ,भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब च्या पदभरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणी मध्ये १६५ से.मी. उंची अनिवार्य केलेली आहे. परंतू यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवार पुरुषासाठी १६० से.मी.व महिला साठी १४५ से.मी. अशी दोघांनाही पात्रतेसाठी ५ से.मी.ची सूट दिलेली आहे, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पोलीस उपअधिक्षक /सहायक पोलीस आयुक्त,अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक अधिकारी अशा विविध पदासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर १६५ से.मी.उंची अनिवार्य केलेली आहेत. मात्र संघ लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी.सूट दिलेली आहे. परंतू राज्य लोकसेवा आयोगात तशी सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे थोड्याफार फरकाने अनुसूचित जमातीचे बहुतांश उमेदवार राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणीत अपात्र ठरतात.
संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्यात अनुसूचित जमाती उमेदवारांच्या बाबत शारिरीक चाचणीत उंची मध्ये ५ से.मी.ची स्पष्ट तफावत आहेत. ही तफावत दूर करुन संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ,राज्य लोकसेवा आयोगातही अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पुरुष व महिला उमेदवारांना ५ से.मी.सूट देण्यात यावी याकरिता ट्रायबल फोरम या संघटनेनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे, जिल्हा सचिव रविंद्र वळवी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश वळवी ट्रायबल फोरम तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी जिल्हा संघटक अनिल वसावे, जितेंद्र पाडवी, दिनेश तडवी अनिल वळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply