IMG-20190826-WA0001
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

  • तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…!
  • दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

………………………………..
पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या रायगड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप करून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
…………………………………

पनवेल/ प्रतिनिधी :
क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पनवेल मध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सामाजिक सलोख्याचे भान राखत क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष व सर्वेसर्वा नामदेवशेठ फडके यांनी रायगड जिल्ह्यातील दहावीच्या गुणवंत व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील शाळांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके व पुढील शिक्षणासाठी रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, 2 हजार रोख रक्कम स्वरूपाचे पारितोषिक, वह्या, बॅग तसेच इतर शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त असे साहित्य प्रदान करण्यात आले. प्रसंगी महाराष्ट्रात आलेल्या भीषण पुरात झालेल्या नुकसानास पुरग्रस्तांना 50 हजार रुपयांची रोख मदत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांच्यातर्फे करण्यात आली. नामदेवशेठ फडके यांचा शिक्षणवारी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. ते नेहमीच अशा सण उत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करत असतात.
कोणत्याही राजकीय पक्षाचे वलय नसताना केवळ निस्वार्थपणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करणाऱ्या नामदेवशेठ फडकेना 80 हुन अधिक अनेक सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सरकारकडून देखील क्रांतिकारी सेवा संघ च्या कार्याचा गौरव केला आहे. या दहीहंडी उत्सवात एकूण सात लाख पंचावन्न हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. तसेच सहभागी गोविंदा पथकांना व सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना देखील रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सर्वेसर्वा नामदेवशेठ फडके, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलासशेठ फडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष डी.के. भोपी, कोकण विभाग अध्यक्ष भारत भोपी, रायगड जिल्हाध्यक्ष विलास म्हसकर, आदिवासी विकास परिषदेचे सचिव बी. पी. लांडगे, उद्योजक दत्ताशेठ भगत, भगवानशेठ भगत, युवा नेता नरेंद्र भोपी, सुकापूर सरपंच किसन भुजंग, पनवेल तालुका युवा अध्यक्ष विकी फडके, नवीन पनवेल शहर युवा अध्यक्ष अजय फडके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply