IMG-20220305-WA0021
कल्याण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश…

आदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश…

मुलुंड/ प्रतिनिधी :
आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सन २०१८- १९ पासून मुलुंड येथील नाहूरगांव व जवाहरलाल नेहरू रोड च्या जंक्शन जवळ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक व्हावा म्हणून आदिवासी विकास मंचाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. अनेक अडचणींना सामोरे जात धैर्य व उद्देश शेवट पर्यंत सोडले नाही. शेवटी सातत्य पाठपुराव्याने अखेर दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकाचे फलक अनावरण सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीत पार पडला.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे, बिरसा ब्रिगेडचे महाध्यक्ष शशिकांत करवंदे, सह्याद्री अध्यक्ष काशिनाथ कोरडे, भाऊसाहेब गंभिरे, मातृशक्ती प्रमुख संगीताताई तळपे, भरत बांडे, जनार्धन लोहार, राजू बांबळे, अंकुश शेळकदे आदी. उपस्थिती होते.

 

Leave a Reply