IMG-20220607-WA0203
उरण कर्जत कल्याण कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल सामाजिक

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये मिनी बससेवेचे दिमाखात लोकार्पण

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये मिनी बससेवेचे दिमाखात लोकार्पण

खारघर/ प्रतिनिधी :
येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेला कल्पना मोटर स्ट्रक्ट प्रा लि. यांच्या सी. एस. आर निधीतून बौद्धीक दिव्यांग मुलांना ने-आण करण्यासाठी मिनी बस प्राप्त झाली आहे. तर आज दिनांक 7 जुन 2022 सकाळी 11.00 वाजता मिनी बसचा लोकापर्ण सोहळा पार पडला. ही सुविधा बौद्धीक दिव्यांग आणि त्यांच्या पालकांना खुपच मोलाची ठरणार आहे. यामुळे अर्थातच त्यांच्या पैशाची व वेळेची बचत होईल. या मिनी बस चे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे संचालक श्री. बी. वी. रामकुमार सर यांनी केले,त्यासोबत या संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी आपले भविष्यातील संस्थेच्या विविध योजना सबंधीत सर्वाना माहिती दिली.
या सोहळ्यात कल्पना मोटर स्ट्रक्ट प्रा. लि. चे संचालक श्री अजित थूमार संस्थेच्या नोयडा प्रादेशीक केंद्राच्या वरीष्ठ व्याख्यता व प्रभारी अधिकारी डॉ. अमृता सहाय मैडम व श्री. के जी अंबाडी सर, व्याख्यता विशेष शिक्षण, मुख्यालय, सिकन्दरबाद उपस्थित होते. या लोकापर्ण सोहळ्यात नवी मुंबई मधील पत्रकार मंडळीनी उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमात संस्थेचे कर्मचारी, बौद्धीक दिव्यांग मुले तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply