20220615_204423
ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल नेरळ पनवेल माथेरान सामाजिक

माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा

माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा

कर्जत/ नितीन पारधी :
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदच्या वतीने आज प्राथमिक शाळांचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे, गुलाबपुष्प देऊन तसेच पाठय पुस्तके आणि खाऊ तसेच सोबत मास्क देऊन स्वागत करण्यात आले. नव विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस महत्वाचा असल्याने तो दिवस उत्सव म्हणून साजरा केला गेल्याने एक चांगला उपक्रम पालिका आणि शाळेच्या वतीने आयोजित केला गेला.

अनेक महिन्यांनी पूर्ण क्षमतेने प्राथमिक शाळा सुरू होत असल्याने माथेरान मधील नगरपरिषदेच्या वीर भाई कोतवाल प्राथमिक शाळेत सर्वच विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. अतिशय आनंदी वातावरणात, मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील नजरेत भरणारा होता. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येईल.
त्यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून पालिका ग्रंथालयात विना फी प्रवेश दिला जाणार आहे. त्या ठिकाणी बाल साहित्य आणि पाठयपुस्तक व्यतिरिक्त आवश्यक असे ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी यावेळी जाहीर केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील तसेच सर्व शिक्षक आणि लहान मुलांचे पालक देखील उपस्थित होते.

Leave a Reply