IMG-20220616-WA0071
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल सामाजिक

देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड

देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड

पनवेल/ प्रतिनिधी :
देवळोली ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. सरपंच काजल मंगेश पाटील  यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना एक मताने सरपंच पदी विराजमान करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती गजानन माळी, पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीश पवार, नानोशी माणघर ग्रामपंचायत सरपंच राजाशेठ पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष अनंत पाटील, मा.सरपंच काजल पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, सदस्या राजश्री पाटील, सदस्य विनोद पाटील, सदस्य मनोज भंडारकर, ग्रामसेवक वैशाली पावसकर, मा. सरपंच रामभाऊ पाटील, गुळसुंदे माजी सरपंच प्रकाश गाताडे, माजी उपसरपंच प्रकाश माळी, वासांबे माजी उपसरपंच संध्या संजय कांबळे, मा.सरपंच संदीप पाटील, मा.उपसरपंच यादव दिघे, मा.सदस्य भास्कर बडवी, मा.उपसरपंच गुरुनाथ पाटील, मा.उपसरपंच शमिल पाटील, शेकापचे जेष्ठ नेते भगवान कोंडीलकर, विठ्ठल पाटील, भगवान पाटील, गणपत देशमुख, किर्ती देशमुख, के एस पाटील, भगवान झिंगे, भिमराव भंडारकर, राजा पाटील, शेकापचे नेते राजेश पाटील, युवा नेते मंगेश पाटील, उमेश पाटील, श्रीकांत पाटील, प्रसाद पाटील, चित्कार पाटील, पी पी पाटील यांचे मित्रपरिवार, आदी मान्यवरांचे महिला हे उपस्थित होत्या विद्यमान प्रभारी सरपंच पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply